लहानपणापासून माझं मन कार्टून नेटवर्क मध्ये कधी रमलच नाही. अगदीच मी एखादाही कार्टून चा शो पाहिलाच नाही अस नाही पण Discovery, Animal Planet, National Geographic यांसारख्या Channels चे अधिक आकर्षण होते/आहे. त्या channels वर दाखवली जाणारी फोटोग्राफी आणि विडीयोग्राफी मनात कायमच घर करत असे. Travel आणि फोटोग्राफी ची आवड निर्माण होण्यासाठी एवढस कारण पुरेसं होत.
बर्याच गोष्टी मला अनुवंशिकतेने माझ्या आजोबांकडून मिळाल्या. 'फोटोग्राफी' ही पण त्यातलीच एक. माझे आजोबा रेल्वे मध्ये नोकरीस होते. मी लहानपणी त्यांनी काढलेले फोटोस पाहिले होते. दणकट मोठा stand, डब्या सारखा दिसणारा उभट फिल्म कॅमेरा आणि तो वापरताना त्यास आणि फोटोग्राफरचे डोकं झाकण्यासाठी वापरण्यात येणार काळ फडक असे त्याचे स्वरूप होते. नंतर माझ्या बाबांनी आणि काकाने त्यांना नोकरी लागल्यावर kodak चा फिल्म कॅमेरा घेतला. अत्यंत छोटा आणि handy असा तो कॅम होता. फिल्म कशी असते हे बघण्याच्या नादात मी कॅमेरा उघडून टयूब लाईट समोर एक्स्पोज केल्याने लहान असतांना बऱ्याचदा ओरडा खाल्ला आहे.
काही वर्षांपूर्वी मी ' आकाशमित्र मंडळ ' नामक खगोलशास्त्राशी संबंधित प्रचार आणि प्रसार करणाऱ्या संस्थेचा सभासद झालो. तिकडे अभिजित अवळस्कर शी ओळख झाली. तो प्रोफेशनल फोटोग्राफर आहे. त्याने काढलेले पक्षी आणि प्राण्यांचे अप्रतिम असे फोटोस पाहून माझ्या डोक्यातला कॅमेरा पुन्हा क्लिक क्लिकाट करू लागला. दरम्यान माझी ओळख आकाशमित्र च्या मनोज बिन्हानी सरांशी झाली. ते एक वेगळच व्यक्तिमत्व आहे. त्यांनी कॅनन चा १०००D हा DSLR कॅमेरा घेतला आणि मला तो पहाण्यास बोलावले. काही दिवसांनी तो कॅमेरा मला वापरण्यास त्यांनी दिला आणि त्यानंतर पुढची ३.५ वर्षे तो माझ्याकडेच होता. यासाठी मी त्यांचा कायम ऋणी आहे.
तसा लहानपानापासून मी अभ्यासात चांगला होतो. १० वी पर्यंत तर बराच बरा होतो. १० वी च्या बोर्ड परीक्षेत मला ९१.०७ टक्के मिळाले. विज्ञानाकडे कल असल्याने साहजिकच मी सायन्सला प्रवेश घेतला. पण ११ वी आणि १२ वी मध्ये मला विशेष असा अभ्यास करावासा वाटलाच नाही आणि मी केलाही नाही आणि त्याचा परिणाम म्हणजे मला १२ वी बोर्ड आणि सी ई टी परीक्षेत खूप कमी मार्क्स मिळाले. AIEEE परीक्षेत मला ठीकठाक गुण मिळाले आणि मी पुढे इंजिनीअरिंगला प्रवेश मिळवला. इलेक्ट्रोनिक्स ची आवड असल्याने मी इलेक्ट्रोनिक्स & टेलिकम्युनिकेशन ही स्ट्रीम निवडली.
मला Vivas आणि Practicals मध्ये कायम चांगले मार्क्स मिळाले पण Theory exams मध्ये प्रगती होत नव्हती. एकीकडे DSLR कॅमेरा आणि माझं टयुनिंग चांगलं जमू लागलं होतं आणि दुसरीकडे सेमिस्टर मध्ये चांगले गुण मिळत नव्हते. कॉलेज मध्ये तर सगळे मला फरहान कुरेशी / आंद्रे इस्थवान वगैरे नावांनी सगळे ओळखत असत. काही जण तर " तू इंजिनीअरिंग सोडून फोटोग्राफीच शिक्षण का घेत नाहीस? " असं विचारत. आपल्याला जगण्यासाठी ऑक्सिजन आणि पाणी/अन्न या दोन्ही गोष्टींची गरज असते त्याप्रमाणे फोटोग्राफी हा माझा ऑक्सिजन आणि इंजिनीअरिंग हे माझे पाणी/अन्न आहे तर मग मी दोघांपैकी फक्त एकालाच कसा काय निवडू शकतो ?…
Peb Fort Trek 28-06-14. Credits:- Omkar Ranade. |
* While Framing The Satpool Bridge * Credits:- Abhijit Prabhu. |
होणाऱ्या टीकांकडे दुर्लक्ष करून मी फोटोग्राफी आणि इंजिनीअरिंगचा अभ्यास दोन्ही सुरु ठेवले. अजूनही स्वताचा DSLR आला नव्हता. मी बाबांना २-३ वेळा त्याबद्दल बोलून पण दाखवले आणि दर वेळेस "हो, घेऊ कि " असे Diplomatic उत्तर मिळाले. २०१३ च्या दिवाळीत ३ नोवेंबरला मला माझा स्वताचा कॅनन ६०D हा DSLR कॅमेरा बाबांनी घेऊन दिला. जसजसा मी फोटोग्राफी मध्ये सिरियस होत गेलो तशी माझी टक्केवारी देखील वाढू लागली.
सेमिस्टर १ - ५३ %
सेमिस्टर २ - ५४ %
सेमिस्टर ३ - ५६ %
सेमिस्टर ४ - ५७ %
सेमिस्टर ५ - ५८ %
सेमिस्टर ६ - ५८ %
सेमिस्टर ७ - ५९ %
सेमिस्टर ८ - ७०.६६ %
Peb Fort Trek 28-06-14. Credits:- Omkar Ranade. |
Gandhari River, Kalyan. 17-09-14. |
~ Sunset ~ 25-09-14. |
शेवटची परीक्षा Distinction सह पास झालो आणि त्याचबरोबर टीकाकारांना पण चोख उत्तर दिले. मी ७व्या सेमिस्टर असतानाच ठरवलं होत की ८ वे सेमिस्टर संपले की पुढचे ४-५ महिने मी फक्त फोटोग्राफी करणार आणि त्याप्रमाणे करत देखील आहे.
धन्यवाद।